औरंगाबाद : महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचार्‍यांसाठी 10 बेड्सचा विलगीकरण कक्ष तयार केला आहे. सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या हस्ते या कक्षाचे शनिवारी दि.8 उद्घाटन करण्यात आले. 
  कोरोनाची लागण झालेल्या मात्र सौम्य लक्षणे असलेल्या व राहत्या घरी विलगीकरणाची सोय नसलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांसाठी हर्सूल येथील प्रशिक्षण केंद्रात हा कक्ष सुरू केला आहे. शहर मंडल कार्यालयाच्या अधिपत्याखाली हा कक्ष सुरू राहील. या ठिकाणी विलगीकरणात ठेवलेल्या कर्मचार्‍यांसाठी जेवण व चहा-नाश्त्याची सुविधाही देणार आहे. भविष्यातही कामाच्या व्यापात महावितरणचे कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्यांना याठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 10 बेडचा सर्व सोयींनी सुसज्ज असा कक्ष उभारण्यात आला आहे. यावेळी प्रभारी मुख्य अभियंता बिभीषण निर्मळ, प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता एकनाथ वाघ, सतीश खाकसे, निधी गौतम, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्सलवार, विनय घनबहादूर, अनिल कराळे, उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने, सहायक अभियंता श्याम मोरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.