पालम - गंगाखेड ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालम येथिल सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद कदम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी संतोष मुरकुटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गंगाखेड ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. रामप्रसाद कदम यांनी तालुक्यातील मागील अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात देण्यात आला. गंगाखेड ग्रामीण पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश कातकडे, आनंद साकला, भगवान जालाले, नगरसेवक तुकाराम तांदळे, महारुद्र अप्पा बेंबळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालम पत्रकार संघाचे अध्यक्ष मारुती नाईकवाडे, धोंडीराम कळंबे ,शांतीलाल शर्मा, अरुणाताई शर्मा, राहुल गायकवाड, मोतीराम शिंदे, गुणवंत सराफ, भरत जोगदंड, भगवान करंजे, अशोक बाहेती, विलास चव्हाण, वैभव लोखंडे, सुदाम लोंढे, मोहन कांबळे, प्रभू राठोड, साबेर खुरेशी, दत्तराव साळवे यांनी अभिनंदन केले आहे.