माजलगाव : राज्य शासनाने इयत्ता 8 वि ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी 4 आँक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्षात शाळा सुरूही झाल्या परंतु नागडगावच्या विद्यार्थ्यांना शिंपेटाकळी ते सांडस चिंचोली हा रस्ता खराब झाल्यामुळे एस.टी.बस अभावी शाळेत जाता आले नाही, याची दखल नागडगावचे सरपंच विनायकराव कदम यांनी घेत शिंपेटाकळी ते सांडस चिंचोली या रस्त्यावर पडलेले खड्डे व रस्त्यावर येत असलेल्या झाडांची फांदी दुरुस्ती स्वखर्चाने दुरुस्ती केल्याने नागडगावच्या विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून नागडगाव येथील विध्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी सरपंच विनायकराव कदम यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र शासनाने इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसांठी शाळा सुरु करण्याचा निर्णय 4 ऑक्टोबरपासून घेतला, मात्र प्रत्यक्ष शाळा सुरु होऊन एक आठवडा झाला तरी नागडगावच्या विद्यार्थ्यीना शिंपेटाकळी ते सांडस चिंचोली रस्त्यावर खड्डे पडल्याने व रस्त्या लगतच्या झाडांची फादी रस्त्यावर आल्यामुळे एस.टी.महामंडळाच्या माजलगाव आगाराने या मार्गावरची एस.टी.बस रद्द केल्याने विद्यार्थी व विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हते, याची दखल नागडगावचे सरपंच विनायकराव कदम यांनी रविवारी घेत शिंपेटाकळी ते सांडस चिंचोली या रस्त्यावरील खड्डे व रस्त्यावर आलेल्या झांडाच्या फांद्या स्वखर्चाने स्व:ताची जेसीबी 8 तास चालवुन व दोन ट्रक्टरद्वारे रस्त्याची दुरुस्ती स्वखर्चाने केल्याने नागडगाव येथील शालेय विद्यार्थ्यांचां शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागडगाव येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी नागडगावचे सरपंच विनायकराव कदम यांचे आभार मानले आहेत.