बीड : कोरोना काळात आप आपल्या कुवतीनुसार सर्वजण या कामात वस्तू, सेवा पैसा या स्वरूपात योगदान देत आहेत. पण यास अपवाद नेकनूर गावात घडलेला आहे. मदत, सहकार्य तर सोडा पण जे कोविड केअर सेंटर मंजूर झालेले आहे, त्यास काही स्थानिक लोकांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असून यामुळे नेकनूरकरांची नेकी संपल्याचे दिसून येत आहे.
नेकनूर गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मूलभूत सुविधा असल्याने येथे सरपंच व गावातील काही युवक यांनी एकत्रित येवून कोविड केअर सेंटर मंजूर करून आणले व कामास सुरुवात केली. विशेष म्हणजे ही जागा जिल्हा परिषदेची आहे व सेंटरला मंजुरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेली आहे. ही इमारत बस स्टॉप जवळ तसेच 8 एककरमध्ये असल्याने प्रशस्त आहे व सर्व बाजूंनी वस्तीच्या 150 मिटर अंतरावर आहे. येथे खूप छान सोय होवू शकते या उद्देशाने येथे सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न करत आहेत. पण स्थानिक थेटे कॉलनी व शहाबाज कॉलनी येथील लोकांनी काही लोकांच्या अफवे मुळे विरोध केला आहे. 100 पेक्षा जास्त लोकांनी येवुन ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिलेले आहे. निवेदनात त्यांनी उल्लेख केला आहे की हे वर्दळीच्या ठिकाण आहे. तसेच या लोकांनी कोविड सेंटर साठी प्रयत्न करत असलेल्या युवकांना व सरपंचांना धमकीही दिली आहे की, जर तुम्ही एकले नाही तर तुम्हाला बघू व आमच्या महिला-मुलं ग्राम पंचायत येथे आणून बसवू. आम्हाला मारू द्या, काय व्हायचे ते होवू द्या पण हे सेंटर नको. एवढे तीव्र विरोध लोक करत आहेत याची माहिती घेतली असता यामध्ये राजकारण घुसलेले आहे असे कळले आहे. तसेच आणखी एक कारण समोर येत आहे की, शाळा बंद  असल्यावर हे लोक पत्ते खेळतात, मटका घेतात, सुरट खेळतात, लूडो गेम खेळतात, दारू पितात, शौचास जातात, जनावरे बांधतात, टोळक्याने एकत्रित बसून गप्पा मारतात. म्हणून केअर सेंटरला तीव्र विरोध करीत आहेत. काही राजकारणी सेंटर उभारणीस मदत करायची सोडून सेंटर विरोधी लोकांना पेटवून देत आहेत तसेच त्यांच्याच सुरात सूर मिसळून विरोध करत आहेत.
या सेंटरला शासन फक्त औषध आणि कर्मचारी देणार आहेत आणि इतर सुविधा मध्ये जेवण, स्वच्छता, पाणी, बेड, हा सर्व खर्च स्वतः करायचा आहे असे स्पष्ट मंजुरी पत्रात उल्लेखित आहे. त्यानुसार कोविड केअर सेंटर समितीने 95 हजार रुपये खर्च केलेले आहेत त्यामध्ये सरपंच यांनी 50 हजार रुपये खर्च केले आहेत. एवढा खर्च करून विघ्नसंतोषी लोकाच्या विरोधामुळे समितीने काम करण्याचे थांबविले असे समितीकडून सांगण्यात आलेले  आहे.