माजलगाव : वरिष्ठ अधिकान्यांचे कसलेही नियंत्रण नसल्याने तालुक्यातील मौजे नित्रुड येथील देवस्थाच्या जमीनीची परस्पर विक्री व खरेदी खत करणार्‍या संबधीत विभाग व अधिकार्‍यावर गभिर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी केली. या मागणीसाठी दि. 15 डिसेंबर रोजी लोक तांत्रीक जनता दलच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

दि. 3 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जिल्हाधिकारी यांचा परवाना नसताना तसेच बकबोर्डचा परवाना नसताना निवड यदी सर्व नंबर 36.37, 66.174.177.179.80. 221, 212, 368 व 369 मधील एकुन 223 एकर जमिनीची परस्पर फेरफार विक्री व बोगस रजिस्ट्री केलेली असून सदर जमीनीवरइल लोकांचे हकलावन्यात आलेले आहे. सदरील झालेले सर्व फेरफार बोगस रजिस्ट्री तात्काळ रद्द करून संबधीत 7/12 वर मुळ देवस्थानचेच नाव लावून इतर हक्कातील सर्व नावे रद्द करुन माजलगांव तहसिलवर वरिष्ठांचे कृठलेही नियंत्रण नाही. नायब तहसिलदार भंडारी ठोस निकालात टोलवाटोलवी करत आहेत. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय गांधी विभागामध्ये चाललेला मनमानी कारभार व एक वर्षापासून शासकीय किती मिटींग घेण्यात आल्या व किती फाईल मंजूर करण्यात आल्या याची माहिती देण्यात यावे.

तसेच निराधार लोकांचे बंद केलेल्या पगारी कोणत्या आधारे बंद करण्यात आल्या आहेत, यांची माहिती देण्यात यावी. संजय गांधी व श्रावण बाळ या कार्यालयाची चौकशी करण्यात यावी. पुरवठा विभागामध्ये जि.आर. प्रमाणे विधवा, अपंग, यांना पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात यावे. तरी मौजे नित्रूड येथील देवस्थानच्या जमीनीच्या परस्पर विक्री व खरेदीखत करणार्‍या संबधीत विभाग व अधिकार्‍यावर गंभिर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करा. म्हणून लोक तांत्रीक जनता दलच्या वतीने जल्हाध्यक्ष सलीम यांनी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.