वैजापूर (सुनिल त्रिभुवन) : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असला तरी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका हा कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या बघता त्यावर प्रशासकीय नियंत्रण राहिलेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरोनाला आला ‘बहर’ त्यात राजकियांनी केला ‘कहर’ अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. उद्घाटनांसह इतर कार्यक्रमांचा धडाकाच सुरू असल्याने यासाठी होणारी गर्दीही कोरोना रूग्ण वाढीस पुरक ठरत आहे. 

राजकीय स्थानिक विविध पक्षाचे पुढारी यांनी उद्घाटन आणि कोरोना रुग्णांना जी सुविधा पुरवण्याची त्याचा धडाकाच सुरू केला आहे. त्यामध्ये मी पुढे, मी पुढे अशी संकल्पना सुरू झाली आहे. विविध पक्षांचे राजकीय पुढारी हे विसरून देखील केले की, वैजापूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील आपण काय करतो. 

विविध ठिकाणी विकास कामे आणि इतर गोष्टींचा उहापोह करत आहे. त्यात शहरातील किंवा ग्रामीण भागातील नागरिकांचे किती नुकसान होत आहे याचा देखील विसर त्यांना पडलेला आहे. त्यामुळे का होईना तालुक्यामध्ये कोरोना हा हातपाय पसरत आहे.  सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी व नेतेमंडळी हे विकास कामांचे उद्घाटने करून कामे जनतेसमोर आणण्याची चढाओढ सुरु आहे. मीच कसा विकास पुरुष हे दाखविण्याच्या खटाटोप करत आहे. मात्र, राज्य शासन व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांची आणि नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा केला आहे. 

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात कलम 144 लागू असतानी देखील विविध राजकीय पक्षांचे पुढारी किंवा नेते मंडळी हे विकास कामांचे उद्घाटने करताना दिसत आहे. कलम 144 च्या नियमानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्‍तींना त्या ठिकाणी परवानगी नसताना देखील गर्दी जमवून कोरोना हा संसर्गजन्य रोग वाढवण्यास हे मदत करत आहे. मग पोलीस प्रशासन गप्प का? या नेत्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.