माजलगाव : तालुक्यातील पात्रुड, लवूळ गावामध्ये परिसरामध्ये चालवला जाणारा मटका, गुटका, धाब्यावर अवैधरित्या विक्री होणारी दारू, पत्ते असे अनेक प्रकारचे अवैध धंदे चालू असून या अवैध धंद्यावर पोलिसांचा अंकुश राहिलेला नसून यामुळे सामान्य जनतेच्या संसाराची राखरांगोळी होताना दिसून येत आहे.
पात्रुड, लवूळ या गावांमधील गोरगरीब जनता कारखान्याचे उचल उचलत असून मटका, गुटका, दारू, पत्ते या अवैध चालणार्‍या धंद्यावर ते पैसे लावत आहेत. यामुळे अशा अवैध धंदेवाल्यांची दिवाळी होत असून गोरगरिबांच्या संसाराचा शिमगा होत आहे. यामुळे गोरगरीब जनतेचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, हे सर्व धंदे पोलिसांच्या डोळ्यासमोर चालू असून पोलीस यंत्रणा मात्र या धंद्यावर ती अंकुश ठेवण्यास अपयशी ठरत आहे. या अशा अवैध चालणार्‍या धंद्याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून ग्रामीण भागांमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे.