श्रीक्षेत्र माहूर - यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी येथील शास्त्रीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या घोसे कुटूंबियांना बेदम मारहाण करणार्‍या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी माहूर तालुक्यातील अ.भा.माळी महासंघ, वंचित बहुजन आघाडी व समता परिषदेच्या वतीने यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.

आरोपीने लोखंडी सळई व रॉडने केलेल्या अमानुष मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या घोसे कुटूंबातील व्यक्तींना नागपुर येथे हलविण्यात आले आहे. पीडित कुटुंबाला पोलीस प्रशासनाचे संरक्षण मिळाले नसल्याने आरोपीचे मनौधर्य वाढले आहे. याप्रकरणी आरोपीवर त्वरित कारवाई न झाल्यास अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर अ.भा.माळी महासंघाचे राज्य संघटक कार्तिक बेहेरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील बेहेरे, अ.भा.माळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश गीर्‍हे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव दादाराव गायकवाड, विजय भगत, सागर जाधव, पवन मोरे, प्रफुल बेहेरे, पवन बेहेरे, सचिन बेहेरे, बाळू ढगे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.