लोणी (खुर्द) : जोरदार वादळामुळे सोलार प्लेटचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथे घडली असून या अवकाळी वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे लोणी खुर्द व परिसरात जोरदार वादळ व पावसाचे वातावरण झालेले आहे. परिसरातील जानेफळ शिवारातील रोहिणी योगेश जगताप यांच्या गट नं.120 मध्ये लावलेल्या सोलर पॅनलच्या पाच प्लेटचे नुकसान झालेले आहे. झाडाच्या मोडलेल्या फांद्याांमुळे सोलर प्लेटसह सिमेंट विहिरीचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. दिवसभर उन्हाचा पारा चढलेला असतो. तर सायंकाळी जोर्‍याचे वादळ व पाऊस असे वातावरण या भागात आहे. शेतात असलेला कांदा, लसूण, अद्रक, बटाटा या पिकालाही यामुळे मोठा फटका बसत आहे.