परभणी  :  परभणी शहर महानगरपालिकेच्या हद्दीत विविध व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना परवाना घेण्याचा आदेश मनपा प्रशासनाने तात्काळ रद्द करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांनी सांगितले आहे.   
परभणी शहर महानगरपालिकेच्या हद्दीत विविध व्यवसाय करणारे छोटे-मोठे सर्व व्यापारी अस्थापना धारकांनी मनपाकडून व्यवसाय परवाना काढणे बंधनकारक करण्यात आले आहे.  यासंदर्भात मनपा प्रशासनाने सन 2018 साली घेण्यात आलेल्या ठरावाचा आदेश आता तीन वर्षानंतर बंधनकारक केला  आहे. मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे बाजारपेठ बंद होती. त्यामुळे  व्यापार्‍यांची आर्थिक घडी विस्कटली आहे .त्यात आता कुठे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. नोकरदारांचे पगार, दुकान भाडे, विज बिल, व्यवसायकर ,आदी बाबींचा खर्च भरून काढणेही फार जिकिरीचे झाले आहे. मनपा प्रशासनाने छोट्या-मोठ्या सर्व व्यापार्‍यांना जाचक व अवाजवी  स्वरूपाचा परवाना कर अचानक पणे लादला  असल्याने व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष पसरला आहे. अशा प्रसंगी शिवसेना शहरातील सर्व व्यापारयांच्या पाठीशी असून मनपा प्रशासनाने वरील आदेश तात्काळ रद्द करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन आज 18 जून शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्त देविदास पवार यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे ,विधानसभा महिला संघटक अंबिका डहाळे, मनपा गटनेते चंदू शिंदे ,मनपा सदस्य प्रशांस ठाकूर, सुशील कांबळे, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, युवा सेना शहर प्रमुख विशु डहाळे, दिलीप गिराम, गणेश सोळंके, अशोक गव्हाणे , विशाल  कळसाईतकर, अमोल फटके, मनोज पवार, संभानाथ काळे ,स्वप्नील भारती, संदीप पाटील, रामदेव ओझा, स्मिता बंडेवार,अर्चना चींचाने, कविता नंदुरे , शिवनंदा प्रजापती आदी शिवसेना - युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.


स्थगिती देण्याची मागणी : मनपा आयुक्त रमेश पवार यांनी मुंबई पुण्याच्या धर्तीवर मनपाचे उत्पन्न वाढावे म्हणून प्रत्येक दुकांनदारास मनपाचा परवाना दरवर्षी घेणे बंधनकाकर करण्यात आले आहे. कोरोनामुळे व्यापारी मेटाकुटी ला आलेला असताना परवाना काढणे बंधनकारक केल्यामुळे अडचणी वाढणार आहेत. मनपा च्या उत्त्पन्न वाढीस व्यापार्‍याचा विरोध नाही पण ही योजना राबवण्यास ही वेळ योग्य नसल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.   वरील विषयी तात्काळ निर्णय घेऊन व्यापारी बांधवांना दिलासा द्यावा, अन्यता भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे सर्व व्यापारी सोबत येऊन मनपा ला घेराव घालण्यात येईल. या वेळी आनंद भरोसे, सर्वश्र नगरसेवक  मंगल मुदगलकर, नंदकिशोर दरक, सुनील देशमुख, प्रशांत पारडीकर, रितेश झांबड जैन,अशोक डहाळे, मोकिद खिल्लारे, मधुकर गव्हाणे उपस्थित होते.