तामसा:विभागीय नियंत्रक अधिकार्‍याच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातील एसटी बस सेवा बंद झाली आहे. यामुळे अवैध वाहतूक बोकाळली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे काळीपिवळी, रिक्षा, प्रवास करावा लागत आहे. अवैध वाहतूकदार प्रवाशांची आर्थिक लुट करत आहेत. पुर्वरत बससेवा सुरु करून अवैध वाहतुकीला आवरघालण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना कामानिमित्त बाहेर गावी जावे लागते. बहुतेक नागरिक ,दुचाकी, चार चाकी वाहनाने प्रवास करतात ग्रामीण भागातील बससेवा बंद आसल्याने गोरगरीब प्रवाशांना खाजगी वाहन शिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. रिक्षाचालक, जिप चालकांनी 3 व्यक्ती व सँनिटरायझर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र कोरोना नियमाची  पायमल्ली केली जात आहे. ग्रामीण भागातील खाजगी रिक्षा चालक  जीप चालक खचाखच विनामास्क प्रवासी बसवले जात आहेत. जिपचालक प्रवाश्याची आडवणूक करून दुप्पट भाडे आकारणी करत आहे. गांव ते तालुक्याचे अंतर 15-20 किलोमीटर च्या आत आसणार्‍या गावातून जाणीव पुर्वक व प्रवाश्याची आडवणूक करून 40-50रूपये भाडे घेत आहेत. भाड्याबाबत प्रवाश्यांनी विचारणा करताच रिक्षा, जीप चालक प्रवाशांची हुज्जत घालत आहेत. प्रवाशांना वाहतूकीसाठी दुसरा पर्याय नसल्याने निमूटपणे दुप्पट पैसे देऊन जीव मुठीत धरून रिक्षा,जीपमध्ये प्रवास करावा लागत आहे.