नायगाव : नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कुंटूर शाखेच्या शाखाधिकार्‍यानी यंदा शेतकरी खातेधारकाना पीककर्ज मोठया प्रमाणात वाटप केले आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या 2 हजार सहाशे 70 शेतकरी खातेधारकाना 15 कोटी 93 लाख 13 हजार 917 रुपयाचे विक्रमी पीककर्ज वाटप केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कुंटूर शाखेकडून परिसरातील शेतकर्‍यांना कसल्याही प्रकारची आडचन व दगदग निर्माण होऊ नये म्हणून शाखाधिकारी बी. जे.वानुले यांनी खातेदारांना एटीएम वाटप केले. जिल्हा बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी एम.आर.हंगरगे यांनी अशाच पद्धतीचे काम करून खातेदारांना व शेतकर्‍यांना पीककर्ज असो की शासनाकडून मिळालेले अनुदान किंवा विम्याची रक्कम असो त्यांनी शेतकर्‍यांना घेऊन जाण्याचे आवाहन करीत होते. नूतन शाखाधिकारी बि.जे.वानुले यांनीही यांच्या कार्यकाळात त्याच पद्धतीने काम करीत असताना दिसून येत आहे. खातेदारांना कोणतीही अडचण भासणार नाही याची खबरदारी बँकेने घेतली असल्याचे नूतन बँक शाखाधिकार्‍यांनी सांगितले आहे.         तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी डी. जे.वाणूले यांच्यासह जी.एस.लांडगे, जी. डी. पाटील, प्रल्हाद विठ्ठलराव यनावार यांनी बँके अंतर्गत संलग्नित असलेल्या 15 संस्थेचे कर्ज वाटपासाठी सहकार्य केले. परिसरातील शेतकर्‍यांना पीककर्ज वाटप करत शाखाधिकार्‍यांनी 491 एटीएम.कार्ड खातेधारकाना 
केले स्वाधीन केले आहे.