औरंगाबाद : धावत्या बसचे चाक निखळून पडल्याची घटना शिऊर जवळ घडली. सुदैवाने बस नियंञनात असल्याने 7 प्रवासी बचावले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे बसचे निखळलेले चाक 1 कि.मी. बसच्या विरूध्द दिशेने धावत गेले.
शुक्रवारी येवला आगराची बस क्रमांक (एम.एच.14 बी.टी.3278) येवला येथून औरंगाबादकडे निघाली होती. या बसमध्ये 7 प्रवासी होते. या बसचे शिऊर येथे पाठिमागचे चाक अचानक निखळून पडल्याची घटना घडली. बस चालकाच्या नियंञनामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे भरधाव बसचे निखळलेले चाक 1 कि.मी. बसच्या विरूध्द दिशेने धावत गेले.