वडीगोद्री : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शारदाताई टोपे यांच 1 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्या कारखान्याच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्यांचे कार्य सतत स्मरणात रहावे व त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा अर्धाकृती पुतळा कारखान्यातील अंकुशराव टोपे स्मारकात बसविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. 7 डिसेंबर 1947 हा शारदाताईचा जन्म दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या अर्धाकृती पुतळयाचे अनावरण आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना ना.राजेश टोपे म्हणाले की, कै.शारदाताई टोपे यांना आपल्यामधून जावून चार महिने झाली आहेत. त्यांनी कारखान्याचे अध्यक्षा म्हणून अत्यंत सचोटीने काम केले. त्यांचे कार्यकाळात कारखान्यास विविध पुरस्कार व पारितोषीके मिळाली. त्यांचेच काळात कारखान्याने जिल्हयातील पहिला 30 केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्पाची सुरुवात झाली. समर्थ कारखान्याचे उभारणीमध्ये टोपे साहेबांबरोबरच त्यांनीही महत्वपुर्ण भुमिका निभावली आहे. त्यांनी आयुष्यभर टोपे साहेबांना खंबीरपणे साथ दिली आहे. आई म्हणून व्यक्तीशः माझ्या व माझ्या परिवाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कै.अंकुशरावजी टोपे साहेब व कै.शारदाताई टोपे यांची शिकवण, त्यांचे ध्येय समोर ठेवून व विचार सोबत घेऊन आपणही काम करीत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त व पुतळयाचे अनावरण प्रसंगी उपस्थितांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या प्रसंगी आ.राजेश राठोड, संग्रामजी देसाई, वर्षा दिदी देसाई, मनिषा भाभी टोपे, उत्तमराव पवार, सतिश टोपे, डॉ. निसार देशमुख, भाऊसाहेब कनके, सतिशराव होंडे, नंदकुमार देशमुख, भागवतराव कटारे, संजय टोपे, प्रा.बी.आर.गायकवाड, बापुराव खटके, तात्यासाहेब उढाण विकास कव्हळे, किरण तारख, कैलास जिगे, बाबासाहेब कोल्हे, सिताराम लहाने, बाबासाहेब बोंबले, रशिद मोमीन, रईस बागवान, सुधाकरराव चिमणे, विजय कनोजे, व्यवस्थापकीय संचालक बी.टी.पावसे, कार्यकारी संचालक डी.एस.पाटील तसेच टोपे परिवारातील सर्व सदस्य, विविध संस्थांचे प्रदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, कामगार व परिसरातील नागरीक उपस्थित होते.