आष्टी : आष्टी येथील सुखकर्ता अर्बन निधीचे चेअरमन बाळासाहेब शिरसाठ यांचा मृृृृतदेह आष्टी शहरातील जवळील धनवडे वस्ती शिवारातील एका विहरीत आढळून आला. त्यावरून त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, अशी परिसरामध्ये चर्चा सुरू आहे. हे गूढ उकलण्यासाठी त्यांचा मृृृृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची श्यक्यता आहे.
शहरातील सुखकर्ता अर्बन निधीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कुंडलिक शिरसाठ (वय-45) हे गुरूवार, दि.8 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास घरगुती वाद झाल्याने घरातून निघून गेले. गेले दोन दिवस त्यांचा फोन बंद असल्याने कुटूंबातील व्यक्तीनी सर्व नातेवाईक, मित्र परिवारातील व्यक्तींना फोन करून तुमच्याकडे आलेत का? अशी विचारणा केली. परंतु कोणाकडेच ते न गेल्याने कुटूंबातील व्यक्ती शोधाशोध करतच राहिली. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आष्टी शहरातील धनवडे वस्ती परिसरात चव्हाण यांच्या शेतात विहीरीचे काम करण्यासाठी मजूर गेले. तेथील धोंडे नामक मिस्तरी शेजारील विहीर पाहण्यासाठी गेला असता त्याला त्या विहिरीत मृतदेह आढळला धोंडे यांनी मुर्शदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर धोंडे यांना फोन लावून माहिती दिली. त्यानंतर तत्काळ आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने मृृृृतदेह बाहेर काढला असता मृताच्या गळ्याला कबंरेचा पट्टा आवळलेला व डोक्याला मार लागल्याचे दिसून आले. सदरील मयताने जर आत्महत्या केली असेल तर तो फाशी घेऊन विहीरीत उडी कसा मारेल? या वरून साशंकता निर्माण झाली असल्याने मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी आष्टी पोलिसांनी नातेवाईकांच्या विनंतीने सदरील मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून,रात्री उशीरा मृताच्या आरणविहरा या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

आत्महत्या केलेल्या विहीरीत गुडघ्या इतकेच पाणी : तर मयताच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसुन येत आहेत. डोक्याला मार लागला होता. त्यामुळे आत्महत्या की हत्या याबाबत शंका निर्माण होत आहे.शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे कारण समोर येईल.
भारत मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, आष्टी