(संग्रहीत छायाचीञ)

परभणी : महानगरपालिकेच्या वतीने सर्वासाठी घरे योजनेतंर्गत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 13 कोटी 17 लाख 80 हजार रूपयाचा निधी शासनाकडून महानगरपालिकेस प्राप्त झाला असून लवकरच लाभार्थ्यांच्या बँकेतील खात्यात हप्ताची रक्कम जमा होणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने सर्वासाठी घरे योजनेतंर्गत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत शहरातील विविध भागामध्ये नागरिकांचे घर होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात 500 घरे मंजूर केले. त्यानंतर दुस-या टप्प्यात 2 हजार घरे मंजूर केले.यानंतर लाभार्थ्यांनी घरे बांधली. काही जणांची अर्धवट बांधकामे झाली. लाभार्थ्यांना टप्याटप्प्याने हप्ते मिळाले. काही लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे महापौर सौ.अनिताताई सोनकांबऴे, उपमहापौर भगवानराव वाघमारे, आयुक्त देविदास पवार यांच्याकडे निधी मिळावा म्हणून लाभार्थी अर्ज करत होते. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महापालिकेस उर्वरीत निधी न आल्यामुळे नागरिक महापौर व आयुक्तांना भेट होते. यामुळे आ.सुरेश वरपूडकर, महापौर सौ.अनिताताई सोनकांबऴे, उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, स्थायी समितीचे माजी सभापती सुनिल देशमुख यांनी पाठपुरावा करून मुंबई येथून मंत्रालयातून पंतप्रधान आवास योजनेचा निधी 13 कोटी 17 लाख 80 हजार रुपये पंतप्रधान आवास योजनेच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घर पूर्ण होणार आहेत. लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ताची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समितीचे माजी सभापती सुनिल देशमुख यांनी दिली.