मुक्रमाबाद : मुक्रमाबद परिसरात शनिवार 12 जून रोजी झालेल्या पावसामुळे खातगाव ( प मु ) येथील 65 वर्षीय वयोरुद्ध सायंकाळी नाल्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  देगलुर-उदगीर राष्ट्रीय महामार्गावरील मारजवाडी, इटग्याळ, लखमापुर फाटा जवळील पुलावरुण पुराचे पाणी गेल्याने दिड तास प्रवासी वाहतूक खोळबंली होती. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर वाहतूक सुरुळीत सुरु झाली. दरम्यान पावसाळ्याच्या नेहमीच वाहनधारकांना जीव मुठीत धरून या संकटाचा सामना करावा लागत आहे.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सह परिसरात गुरुवारी झालेल्या पेरणी योग्य झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.शनिवारी सांयकाळी मुक्रमाबादसह सर्वदूर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाली. पेरण्या खोळंबल्या तर छोटे मोठे नाले खळखळून वाहत असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुरता तरी पाण्याचा प्रश्न सुटला आहे. खतगाव (प मु) येथील वयोवृध्द विठ्ठल धोंडीबा  माने हे रोडवरुन शेताकडे जात असताना जवळच असलेल्या नाल्याला अचानक  पुर आला प्रवाहात पाण्याचा अंदाज न आल्याने वयोवृध्दाचा वाहून दुर्देवी मृत्यू झाला. हि घटना अनेक लोकांनी पाहिली पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे सदरील व्यक्तीचा जीव वाचवण्यास कोणी ही धाव घेतली नाही. लगत असलेल्या पाझर तलावातून विठ्ठल माने यावृध्दाला तरुणानी बाहेर काढून पिएमसाठी मुक्रमाबाद आणण्यात आले. सपोनि कमलाकर गड्डीमे, महसूलचे तलाठी ज्ञानेश्वर रातोळी,  शेशीकपुर तेलंग, मारोती श्रीरामे हे घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

प्रशासनाचे दुर्लक्ष : देगलुर-उदगीर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होत असते. मारजवाडी, इटग्याळ, लखमापुर फाटा जवळील पुलावरुण पुराचे पाणी जात असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दरम्यान रस्ता ही अरुंद असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. मुक्रमाबाद ते मारजवाडी दरम्यान चार नाले असल्याने नेहमीच पावसाळ्याच्या दिवसात वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे या विषयी प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे असून वाहनधारकांचा दिवघेणा प्रवास थांबाबा अशी मागणी होत आहे.