औरंगाबाद : स्वप्नातले घर मिळविण्यासाठी अनेकांना भटकंती करावी लागते. स्वस्तात मस्त जागा आणि घर एकाच छताखाली बघावयास मिळावे आणि आवडलेले घर लगेच बुक करता यावे, या हेतूने खिंवसरा ग्रुपने खिंवसरा प्रॉपर्टी शोकेसच्या माध्यमातून ग्राहकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. तीन दिवशीय प्रदर्शनात हजारपेक्षा ग्राहकांनी भेट देऊन हक्काचा घराची बुकिंगही केली. शेवटच्या दिवशी गुंतवणूक करणार्‍या ग्राहकांसाठी इन्वेस्टर डे देखील साजरा करण्यात आला.
आगामी सण, उत्सवासाठी योग्य घर, बंगलो, फार्म हाऊस किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय नागरिकांना मिळावा, याकरिता खिंवसरा ग्रुपच्या वतीने 10 ऑक्टोबरदरम्यान खिंवसरा हेडक्वाटर्स, प्लॉट नंबर 16, एमआयडीसी चिकलठाणा, विमानतळासमोर जालना रोड येथे प्रॉपर्टी शोकेस प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनात शहराजवळ आणि शहरात खिंवसरा प्रकल्पांमध्ये वास्तुशास्त्रानुसार पूर्ण तयार झालेल्या 12 विविध 2 बीएचके, 3 बीएचके, 4 बीएचके, फार्म हाऊस, फ्लॅट, बंगलो, दुकाने आदींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध मिळाले़ शिवाय सियॉनिमक, दुर्गा प्लायवूड, एमिनन्ट सर्विसेस, आर्किपेल आर्किटेक्ट, पॅलेट फर्निशिंग प्रोन्सिंझ मार्केटिंग व्हेंचर्स आणि डी.जे.कन्स्ट्रक्शन आदींनीही यात सहभाग घेतल्याने ग्राहकांना घरांबरोबरच अन्य सजावटींची माहिती देखील मिळाली. तीन दिवशीय प्रदर्शनात एक हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी भेट दिली. खिंवसरा ग्रुपच्या प्रकल्पांची माहिती जाणून घेऊन कमी किंमतीत परवडेल, अशा वास्तू पाहून आनंद व्यक्त केला. अनेकांनी लगेच गुंतवणूक करून स्वप्नाचे घर साकारण्यासाठी पाऊल टाकले. प्रत्येकाला हवे असलेले बजेट होम्सचे पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने हे प्रदर्शन ग्राहकांसाठी पर्वणी ठरले.

या प्रकल्पांबद्दल ग्राहकांचे आकर्षण : खिंवसरा सिटी (पैठण रोड), खिंवसरा ऑटमन (पन्नालालनगर), 3 आणि 4 बीएचके टाऊन (तीसगाव), औरा खिंवसरा पार्क, खिंवसरा बाजार औरंगपुरा, खिंवसरा ऑगस्ट हायस्ट्रीट, खिंवसरा पार्क, खिंवसरा स्न्वेअर, खिंवसरा ऑरेंज स्न्वेअर वाळूज, खिंवसरा बिजनेस सेंटर वाळूज, खिंवसरा गोल्ड प्लेक्स जालना रोड, खिंवसरा कॉलनी पडेगाव, खिंवसरा लोटस समर्थनगर आदी प्रकल्पांतील गृह व दुकान खरेदीवर ग्राहकांनी आकर्षक रोख डिस्काऊंटचा लाभ घेतला. या सर्वच प्रकल्पांबद्दल ग्राहकांचे आकर्षण असल्याचे दिसून आले.

आकर्षक रोख डिस्काऊंटचा लाभ :  स्वत:चे घर असावे असे सर्वांचेच स्वप्न असते. कामाच्या व्यापामुळे जसे हवे तसे घर शोधणे अवघड जाते. हीच बाब हेरून एकाच छताखाली ग्राहकांना विविध प्रकल्पांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती. दहा लाखांपासून दीड कोटीपर्यंतची प्रॉपटी प्रदर्शनात पहायला मिळाली. प्रकल्पांतील गृह व दुकान खरेदीवर ग्राहकांना आकर्षक रोख डिस्काऊंटचा लाभ ग्राहकांनी घेतला. प्रदर्शनात आलेल्या प्रत्येकांना समाधान वाटल्याशिवाय राहिले नाही.