सोयगाव - सत्तेसाठी कितीही मुहूर्त काढले आणि येवू म्हटले तरी सत्तेच्या सारीपटावर पाच वर्ष महाआघाडीच राहील असा विश्वास व्यक्त करत भाजपसाठी सत्ता हा विषयच नाही असा टोला शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी भाजपाला लगावला आहे. आगामी नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय तयारी करून कामाला लागण्याच्या सूचना पदाधिकार्‍यांना शुक्रवारी आढावा बैठकीत दिल्या.सोयगाव येथे शिवसेनेच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनेते विनोद घोसाळकर बोलत होते.

नगर पंचायतीची निवडणूक ही शिवसैनिकांची निवडणूक आहे.त्यासाठी 17 च्या 17 जागा निवडून आणायच्या असल्याने शिवसैनिकांनी कामाला लागून आजपासूनच प्रचाराची धुरा हाती घ्यावी असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, युवानेते अब्दुल समीर, मा.उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख प्रभाकर काळे, अंकुश रंधे, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, राजू गर, सुधाकर पाटील, तालुका संघटक दिलीप मचे, डॉ.अस्मिताताई पाटील आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी मांडले.यावेळी डॉ.अस्मिताताई पाटील, सुदर्शन अग्रवाल,ि दलीप मचे, अब्दुल समीर, नरेंद्र त्रिवेदी,डॉ.आमदार अंबादास दानवे,आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलतांना विनोद घोसाळकर यांनी सांगितले की, कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अव्वल असल्याचा दाखला दिला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे केंद्रातून कितीही अडचणी निर्माण केल्या तरी राज्य सरकार निर्णयावर ठाम राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आगामी होणार्‍या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज शुक्रवार ( दि.27) रोजी सोयगांव येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी होणार्‍या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सोयगांव नगरपंचायतसह ग्रामपंचायतीवर ना.अब्दुल सत्तार साहेब मार्गदर्शनाखाली भगवा फडकवण्याचा संकल्प करण्यासाठी तमाम शिवसैनिकांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. असे मत संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केले.

तसेच सिल्लोड-सोयगांव मतदार संघाचे युवानेते अब्दुल समीर यांनी तमाम शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांना सोयगाव नागरपंचायतीवर भगवा फडकावण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका उपप्रमुख गुलाबराव कोलते, शहराध्यक्ष संतोष बोडखे, उस्मान पठाण, रमेश गव्हांडे, दिलीप देसाई, दिनेश हजारी, नंदू हजारी, चंद्रास रोकडे, अक्षय काळे, योगेश नागपुरे, विक्रम चौधरी, विनोद मिसाळ, श्रीराम चौधरी, विजय चौधरी,दिनेश काळे, महेश चौधरी, प्रकाश बोर्डे, सोपान देवरे, एकनाथ महाजन,योगेश पाटील, भगवान वरणगाने,शेख रौफ, अमोल मापारी, भगवान टोकरे,किशोर मापारी,बाबू चव्हाण,सलीम पठाण, शमा तडवी, सांडू राठोड, राधेश्याम जाधव, रशीद पठाण, रविंद्र बावस्कर, शेख सत्तार,डॉ.रघुनाथ फुसे, भिका अप्पा, राजू गव्हाड, गणेश कापरे,शरीफ शहा, फेरोज पठाण, विलास राठोड,गणेश राठोड,शेख मुन्ना,दादाराव जाधव, शिवाजी राजपूत, भगवान इंगळे, कृष्णा आप्पा क्रुलेकर, समाधान काळे, दीपक बागुल, पंडित सरपंच, गणेश खैरे, सुपडू पाटील, उपनागराध्यक्षा मंगला राऊत, डॉ.स्मिता पाटील, द्रौपदा बाई सोनवणे, सुरेखा तायडे, आदींसह शिवसेना व युवासेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार सोपान देवरे यांनी केले.