औरंगाबाद / प्रतिनिधी,


जन शिक्षण संस्थान औरंगाबादचे कैलास कडुबा सोनवणे यांना भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयतर्फे दिला जाणारा कौशलाचार्य अवार्ड-2020 घोषित झाला आहे. कैलास सोनवणे हे जन शिक्षण संस्थानसोबत मागील 34 वर्षांपासून निस्वार्थपणे काम करत आहेत. हा पुरस्कार जन शिक्षण संस्थान कार्यालयाचा गौरव वाढविणारा आहे.
कैलास सोनवणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा लाभ समाजातील गरजूं, उपेक्षित व अशिक्षितांना व्हावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. याची दखल घेऊन भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयतर्फे कौशलाचार्य अवार्ड-2020 ने ते आता सन्मानित होत आहेत. देशभरातील 272 जन शिक्षण संस्थानाच्या स्पर्धात्मक व तुलनात्मक विश्‍लेषणाने, अभ्यासाने सदर अवॉर्ड कैलास सोनावणे यांना प्राप्त झाला आहे. जन शिक्षण संस्थान औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. सुभाष झवर, उपाध्यक्ष डॉ. मोहन फुले, सदस्य सुलोचना नाईक, संचालक रणधीर गायकवाड, कार्यक्रम अधिकारी शीला लखमाल, पौर्णिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने इलेक्ट्रिशियन प्रशिक्षक म्हणून सोनवणे काम करत आहेत. संस्थांनच्या माध्यमातून ते खेड्यातील गरीब व गरजू लाभार्थींना इलेक्ट्रिशियन कोर्से करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. हा पुरस्कार मिळत असल्याबाबत त्यांनी सांगितले की, जन शिक्षण संस्थानने मला संधी दिल्यामुळेच मी या पुरस्कारस पात्र ठरलो, यांचा मला अभिमान आहे.