माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सातवा गाळप हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर रविवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार बाजीराव जगताप व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहनदादा जगताप, राहुल जगताप, तसेच संचालक जीवनराव जगताप, संतोषराव यादव, विलास बडे, श्रीकृष्ण सोळंके, भगवानराव नरवटे, दिगंबर थावरे, पांडुरंग शिंदे, रावसाहेब गायकवाड, दिलीप घुबडे, एकनाथ डाके, हनुमंत बादाडे, दत्ता वाळसकर, शिवाजी सोजे, रमेश मोरे, भाऊसाहेब गोंडे, माणिक राठोड, गोविंद करवा तसेच बाजार समीतीचे उप सभापती अच्युतराव लाटे, कार्यकारी संचालक महेश सगरे, शेतकी अधिकारी सुरवसे, सचिव चंद्रकुमार शेंडगे, चीफ इंजिनिअर कणवळे, चीफ केमिस्ट थेटे तसेच कारखान्याचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, कामगार, मुकादम, ऊसतोड मजूर, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.