मुखेड : मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाला दि.22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास भीषण आग लागली या आगीत शस्त्रक्रिया विभागातील अतिशय मौल्यवान उपकरणे जळून पूर्णतः खाक झाली. यात हजारों रूपयाचे नुकसान झाले     

मुखेड येथील उपजिल्हा रुग्नालय 100 खाटांचे असुन सुसज्य शस्ञक्रियागृह आहे.यामुळे नेहमिच नेञ शस्ञक्रिया, हायड्रोसिल,अ‍ॅपन्डिक्स, कुटुंब कल्याण शस्ञक्रिया , हरनिया,सिझरिन, अशा शस्ञक्रिया होतात.  22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या खिडकीतून  धुर बाहेर येत असल्याचे दिसून आले. यावेळी कर्मचार्‍यांनी दरवाजा काढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या विभागास पूर्णतः आगीने आपल्या विळख्यात घेतले होते. शेवटी या विभागाच्या खिडकीचे तावदाने फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात आपला जीव धोक्यात घालून डॉ. संतोष टाकसाळे, शेख वल्ली, एम.एल.चलावाड, वाय.डी,वाघमारे डॉ. जुनेद,योगेश पवार,  जी.ज.सगर यांनी तात्काळ नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय चव्हाण व तहसीलदार काशिनाथ पाटील यांना फोन करून माहिती दिली.असता मुख्याधिकारी यांनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्तरळी पाठवली तत्पूर्वी आरोग्य कर्मचारी व जमावाने आग विझवण्याचा प्रयत्न केला.माञ अग्निशमन फथकाने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत सबंध शस्त्रक्रिया विभाग जळून खाक झाले होते. सदर आग ही वातानुकुलित यंत्रा पासून लागले असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. याआगीत शस्त्रक्रिया विभागाच्या किमंती वस्तू जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचेही कळते.