जिंतूर : जिंतूर शहरात असणार्‍या जालना रोड परिसरात हिंगोली शहरातील एका भोळसर 21 वर्षीय विवाहित महिलेला घरात डांबून सतत तीन दिवस बलात्कार केल्याची घटना दि.29 सप्टेंबर,मंगळवार रोजी उघडकीस आली आहे. जिंतूर पोलिसांत दाखल फिर्यादी नुसार जिंतूर शहरातील जालना रोड परिसरातील नवीन पेट्रोल पंप परिसरात राहणार्‍या शंकर सुदाम पाटोळे याने जिंतूर बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या या महिलेला आरोपीने त्याच्या घरी नेले. या महिलेला मदत करण्याच्या थापा दिल्या. नंतर या भोळसर महिलेला घरातील एका खोलीत डांबून तिच्या नाकातील अर्धा ग्रामची ठेपी आणि पायातील बिचवे काढून घेत लोखंडी रॉडने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत सतत तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कार करणार्‍या आरोपी विरोधात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार जिंतूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 376, 392,368,506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर पोलीसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, जिंतूर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रवि मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.