लोहा : सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून सावरगाव नसरत येथील शेतकरी हरी सटवा बोईनवाड वय 42 वर्षे यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.
पाच वर्षापासून नापिकी वर बँकेचे पिक कर्ज व यंदा हातातोंडाशी आलेले पिक परतीच्या पावसाने भुईसपाट झाले. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आता जिवन कसे जगावे या विवंचनेतून मंगळवारी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी अशा परिवार आहे. या प्रकरणी माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित नोंद करण्यात आली.