ढोरकीन - पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील औरंगाबाद पैठण मार्गालगत गावातील मशिदीच्या वळण रस्ता परिसरात ग्रामपंचायतच्या साफ दुर्लक्षामुळे अतिशय घाणीचे साम्राज्य पसरले असून कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. दिवसभर वराह व मोकाट कुत्री या घाणीवर कळपाने ठान मांडून आहेत. याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे. गावातील अनेक गल्लीतील मुख्य रस्त्यावर गटार साचल्यामुळे रस्त्यावरून येजा करणे मोठे मुश्किल ठरत आहे. पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील गावातील गल्लीत रस्त्याने ये जा करणार्‍या नागरिकांना दूषित पाण्याच्या दुर्गंधिमुळे मोठा मनस्ताप सहन करत कुचंबनेला सामोरे जावे लागत आहे.

दिवसभर अनेक ग्रामस्थ या रस्त्याने येजा करत असलेल्या मुख्य रस्त्यावर गेल्या कित्तेक दिवसांपासून ढोरकीन ग्रामपंचायतच्या सोइस्कर दुर्लक्षामुळे परिसरातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी साचलेले राहत असल्याने अतिशय घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणच्या घाणीमुळे ग्रामस्थाच्या घरात आळ्या व कीडे पसरत आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. घरासमोरील घाण उचलन्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकीकडे स्वच्छतेसाठी जाणीव जागृति करण्यात येत आहे तर ढोरकीन ग्रामपंचायत ग्रामस्थांना नाहक वेठीस धरत आहे. वसाहतीतील मुख्य गल्लीत व परिसरात गावातील वाहत आलेले सांडपानी साचतआहे. दररोज या परिसरात गावातील सांडपाणी वाहत येते. व तेथे साचलेल्या अवस्थेत जैसे थे साचुन राहते. परिणामी ग्रामस्थांना याचा नाहक मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेसाठी शासकीय स्तरावरुन जिल्हा परिषद व पंचायत समितिच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासनाचे ग्रामपंचायत स्तरावर वित्त खर्च होत आहे. व जाहिरातींद्वारे जाणीव जागृति केली जात आहे. मात्र ढोरकीन ग्रामपंचायतच्या दुर्लक्षाने रस्त्याने येजा करणारे ग्रामस्थ वेठीस धरले जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संबंधित अधिकार्‍यांनी तात्काळ प्रत्यक्षरित्या शहानिशा करून याची दखल घ्यावी व या दुरावस्थेतून तात्काळ मुक्ति द्यावी अशी मागणी ढोरकीन येथील वसाहतीतील त्रस्त ग्रामस्थातुन केली जात आहे. गावातील ग्रामस्थांना येजा करताना खड्यांचा अंदाज येत नाही. पानी जैसे थे साचुन राहिल्याने वाहने जातायेताना अंगावर दुर्गंधियुक्त दूषित पाणी पडते. साचलेल्या दूषित पान्यावर डायरिया, डेंगू, मलेरिया, टायफाईड व चिकुन गुनियासारख्या डासांची उत्पत्ति होन्याची शक्यता आहे. गावकर्‍यांना अस्वछतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. ढोरकीन येथील ग्रामपंचायत प्रशासनाने घंटा गाडी असूनही गावातील रस्त्यावरील घाण उचलन्यास टाळाटाळ केली असल्याने सर्वत्र दुर्गंधी व घाण पसरली आहे.