(संग्रहित छायाचिञ)
उमरगा :
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील तीन दिवसापासून बेपत्ता असलेले  संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. युवकांचा मृत्यू हे गावाजवळ एका हौदात सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृताच्या तोंडावर, डोक्याला व कानाच्या पाठीमागे जखमा असल्याची माहिती सांगण्यात आली. हा घातपात असल्याचा संशय असल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर सरणावर झोपवलेल्या मृतदेहाचे स्मशानभूमीतच दुसर्‍यांदा शवविच्छेदन करण्यात आले.
गुंजोटी येथील कमलाकर गुंडू माने (वय 30) हा युवक तीन दिवसापासून बेपत्ता होता. घरातील लोकांनी, नातेवाईकांनी युवकाचा शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती अपयश आलं त्यामुळे सोमवारी दिनांक 22 रोजी त्यांचे भाऊ जोतीराम गुंडू माने उमरगा पोलिस स्थानकात याबाबत   बेपत्ता असल्याची अर्ज देण्यात आला होता. पोलिसांनी शोध मोहीम राबवली एका तासाच्या आत गावा जवळ जुन्या इमारत परिसरातील  जुन्या हौदात प्रेत तरंगताना आढळून आले.   पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्या मृतदेहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गरड यांनी पोस्टमार्टेम केले. घातपाताचा तपास करुन आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी करत पोस्टमार्टेम केलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी विरोध केला. मात्र प्रशासनाने सर्वांची समजून काढून मृतदेह ताब्यात दिला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला व सरनावर रचून अग्निसंस्कार करण्याची तयारी पूर्ण झाली आसतानाच सायंकाळी सात वाजता मृतदेहाचे पुन्हा पोस्टमार्टेम करण्यात  आले. डॉक्टराने स्मशानभूमीतच मृतदेहातील विशिष्ट नमुन्याचे शॅम्पल घेतले.