माजलगाव : जेवढे संघटन मजबूत तेवढा पक्ष मजबूत होत असतो माझ्या विजयात बूथ रचनेचा मोठा वाटा असून, आगामी काळात पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी कार्यकर्त्यानी परिश्रम घ्यावेत. 
प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता माझा प्रतिनिधी असून बूथ सक्षमीकरणासोबत कार्यकर्त्यानी त्यांच्या गावातील प्रश्नांची सोडवणूक करावी, बूथ कार्यकर्त्यांच्या गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्राध्यान्याने कार्यरत राहू, असे प्रतिपादन खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी माजलगाव येथे मंगळवारी (दि.23) आयोजित बूथ रचनेच्या बैठकीत केले. माजलगाव शहरात बूथ रचनेच्या अनुषंगाने बूथ प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  कोरोनामुळे बूथ प्रमुखांची बैठक रद्द करून शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले. या प्रसंगी बीडच्या रेल्वे करिता मंजूर करवून आणलेल्या निधी बाबत त्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करून त्यांचा माजलगाव भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रकाश आनंदगावकर, अरुण राऊत, डॉ. तिडके, डॉ. देविदास नागरगोजे, शंकर देशमुख, ज्ञानेश्वर सरवदे, तात्या पंचाळ, सुशांत जाधवर यांच्यासह तालुक्यातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.