सेलू : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरसुध्दा सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी त्याचे खुलेआमपणे उल्लंघण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.23) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरत दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक सकाळपासून बाजारपेठांमधुन फेरफटका मारत होते. विशेषतः या पथकाने कारवाई सुरू केल्या पाठोपाठ जिल्हाधिकारी मुगळीकर हे स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील आरआर टॉवर, गांधीपार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रोड, वगैरे भागात पायी फेरफटका मारत जिल्हाधिकार्यांसह पथकाने काही वाहनधारकांना समज दिली. काहींना दंड ठोठावला. व्यापार्यांना कठोर शब्दात मास्क वापरण्यासह सॅनिटायझरची व्यवस्था करा, सोशल डिस्टंसिंग पाळा, असे सुनावले.

विदर्भातील वाहतुकीस निर्बंध : जिल्ह्यात नागरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भातील जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात ये-जा करणार्‍या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंध जारी केले आहेत. विदभातुन परभणीत जिल्ह्यात येणार्‍या व परभणी जिल्ह्यातून वरिल सर्व जिल्ह्यात जाणार्या खासगी व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस जिल्हाधिकार्यांनी प्रतिबंध जारी केले आहेत. याबाबतचे आदेश सोमवारी (दि.23) काढले.