बिडकीन - औरगांबाद-पैठण हा चौपदरीचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग श्रेणीत येत असताना या 50 किमीचा महामार्ग आहे, बिडकीन मार्गे असून हा मार्ग बिडकीनच्या बाहेरून बायपास करण्याचे काही कारस्थान होण्याची शक्यता असल्याने बिडकीन येथील नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये बिडकीनचे माजी सरपंच अशोक धर्मे, अ‍ॅड.सतीष हाडे, किरण गुजर, अकुंश काळे यांनी दिले आहेत.

सदर चौपदरीकरण काळाची गरज असून यात शासनाची जमीन जागा असतांना विना कारण हा राष्ट्रीय महामार्ग बिडकीनच्या बाहेरुन नेण्याचे कारणस्थान होत ऊसन गेल्या 8 वर्षातच नव्याने औद्योगिक क्षेत्राचे कार्य जवळ जवळ संपत असतांना या गावातील रस्ता चौपदरीकरण होत आहे मात्र हाच रस्ता बिडकीनच्या बाहेरून कश्या साठी यात शासनाला जमीन संपादीत करण्याची गरज नसतांना व पांरपारीक रस्ता असतांना तो बाहेरून नेण्याचा घाट काही मंडळी घालत असून या निवेदनाद्वारे विरोध दर्शविला आहे.