सेलू (पुनमचंद खोना): सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील मागील पाच वर्षापासून बंद पडलेली डोळ्याच्या मोतीबिंदू ऑपरेशनची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यासाठी सेलू तालुका विकास कृती समितीच्या वतीने ता. 22  फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले.
या ठिकाणच्या रिक्त जागा त्वरित भरणे, अद्यावत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सर्व सोयींनी युक्त अशी रुग्णवाहिका मिळावी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पन्नास घाटावरून 100 घाटापर्यंत विस्तारीकरण करणे बाबत शासनाकडे पाठवलेला प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे या सर्व प्रश्नाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. डॉ नागरगोजे यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व समस्या ऑन दी स्पॉट सोडवण्याचे आश्वासन कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना दिले. याप्रश्नी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना समक्ष भेटून निवेदन सादर केले. उपजिल्हा रुग्णालयातील 100 खाटांचे प्रश्न तसेच सेलू तालुक्यातील रवळगाव येथील प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न शासनाकडे पाठवण्याबाबत शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, निमंत्रक डॉ विलास मोरे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी समन्वयक डी व्ही मुळे आदी उपस्थित होते.