परांडा : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला असून नवनिर्वाचित सदस्याला जनतेने निवड करून कौल दिला. सरपंचपदाची आरक्षित जागेची सोडत दि. 22 जानेवारी रोजी होणार असून ते आरक्षण सोडतीकडे सर्व राजकीय गाव पुढार्‍यांचे लक्ष लागले आहे. 

सरपंचपदाच्या गावाचे आरक्षण निवडून आलेल्या सदस्य तसेच बहुमताने सदस्य संख्या आवश्यक आहे. आरक्षित जागेवर पॅनल प्रमुखाकडे सदस्याची आवश्यकता भासणार आहे.ज्या पॅनल प्रमुखाने पॅनल टू पॅनल सदस्य संख्या निवडून आणली अशा सदस्यांना अडचण भासणार नाही. आगामी सरपंच पदाचे गणित उद्याचा आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे. यामुळे आरक्षण सोडतीकडे विशेष लक्ष सर्वच राजकीय पुढार्‍यापुढे पडला आहे. सरपंच पदाचे दावेदार हे प्रामुख्याने आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होतील. तालुक्यात 9 अनुसूचित जाती प्रवर्ग, 9 अनुसूचित जमाती, 19 इतर मागास प्रवर्ग व 43 सर्वसाधारण असे आरक्षण पदासाठीची सोडत होणार आहे.