हदगाव : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस नगरपालिका व महसुल विभाग सयुक्तरित्या विदर्भातीच्या सीमेवर चेक पोस्ट सुरु करण्यात आल्याची माहीती हदगांव तालुक्याचे उपविविभागीय अधिकारी जिवराज डापककर यांनी दिली.  हदगा़व परिसरातील गोजेगाव परिसरातील विदर्भाच्या सीमेवर ये-जा करणार्‍या वाहनातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 
सोमवार पासुन चेक पोस्ट निर्माण करण्यात आला आहे . शहरात व तालुक्यात मास्क न लावणार्‍या कडुन दंड व सामाजिक अंतर फज्जा उडविणार्‍यांना दंड लावण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती डापकर यांनी दिली.  गेल्या काही दिवसात यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नादेड  जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनाच्या बाबतीत नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना केल्या आहेत.  जे नागरिक कोरोनाचे नियम पालन करणार नाहीत अशा नागरिकांवर कठोर कारवाई करवाई करा अशा सुचना स्थानिक प्रशासनाला दिल्याचे  उपविभागीय अधिकर्‍यांनी सांगितले. हदगांव शहरात सोमवारपासून  महसुल, न.पा. व पोलिस प्रशासन  कामाला लागले आहे.  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढताच वेळीच उपाय म्हणून सोमवार पासुनच  ही मोहीम आधिक तीव्र पणे राबविण्यात येत आहे. हदगाव शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे अहवान हदगाव न.पा. मुख्याधिकारी विजय येरावाड यांनी केले आहे. यावेळी उपविभागीय आधिकारी तथा तहसिलदार जीवराज डापकर, उपजिल्हारुग्णालयचे वैधकीय अधिक्षक ढगे, न.पा. चे मुख्यधिकारी विजय येरावाड, हदगांव पोलिस स्टेशन पोलिस निरक्षक राख  उपस्थित होते.