उदगीर : शेतकर्यार्‍यांच्या शेतातील उत्पादन क्षमता वाढवून त्यांना सक्षम करण्यासाठी विविध 23 योजनांना अनुदान मिळऊन देणारी नानाजी देशमुख कृषीसंजीवणी पोकरा या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. ज्या गावांनी सर्वात जास्त अनूदान मिळवेल. त्या गावासाठी 20 लाख रुपयाचे बक्षीस देणार असल्याची घोषणा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतलेल्या कार्यशाळेत केली आहे.
या कार्याशाळेला जि.प.चे अध्यक्ष राहूल केंद्रे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदास्य तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, जि.प.चे माजी सभापती बापुराव राठोड, पं.स.सभापती शिवाजी मुळे, उपसभापती बाळासाहेब मर्लापल्ले, जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी दत्तात्रय गवसाने, जिल्हा कृषी विकासाधिकारी चोले, तहसिलादार रामेश्वर गोरे, कृषी अधिकारी संजय नाबदे, मंडळ कृषीअधिकारी सुनिल देवनाळे, एस. आर. पाटील, राधा चिरके आदींची उपस्थिती होती. 
पुढे बोलताना बनसोडे म्हणाले, राज्य शासनाने शेतक-यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान 23 योजना राबवित आहे. ही योजनेचा मतदारसंतील 47 गावांत चांगल्या पद्धतीने राबवून एका शेतकर्‍याला जास्तीत जास्त योजना मिळवून देऊन गावातील एकही शेतकरी या योजनेपासून वंचित ठेऊ नका. ज्या गावांनी या योजनेत सर्वाधिक फायदा घेतला. त्या गावाला 20 लाखांचे बक्षीस दिले जाईल, ज्यामध्ये मुलभुतचे 10 लाख तर आमदार फंडातून 10 लाख रुपये अशी बक्षीसाची रक्कम असेल. या योजनेबरोबरच शासनाची प्रत्येक योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकार व कर्चार्‍यांनी काम करावे असे त्यांनी स्पष्ठ केले.
जि.प. अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी अधिकार्‍यांना योजना कागदावर न राबवाता शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे. शासकिय कागद किचकट प्रक्रियत न टाकता स्वतःच कृषी सहायकांनी ऑनलाईनच्या प्रक्रिया पुर्ण करुन शेतकर्‍रयांना सहकार्य करावे असे यावेळी सांगितले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक विभागीय कृषीअधिकरी महेश तीर्थकर, यांनी केले. यावेळी उदगीर व जळकोट तालूक्यातील पोकरा योजना मंजूर झालेल्या 47 गावातील सरपंच ग्रामसेवक कृषीसहायक आदींची उपस्थिती होती.