उमरगा : माकणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी याबाबत ग्राम कोरोना नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली.

रविवारी (दि.18) सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय माकणी येथे ग्राम कोरोना नियंत्रण समिती माकणी समितीचे अध्यक्ष सरपंच विठ्ठल साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक पार पडली. यावेळी माकणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यामुळे येथे कोरोनाची टेस्ट करण्यात येत आहे. यावेळी गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. गावातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारासाठी अनेकांना लोहारा, तुळजापूर व उस्मानाबाद येथे पाठवण्यात येत आहे. त्यांना वेळेवर बेड, औषधी उपलब्ध होत नाहीत. यामुळे गावातच कोरोना पेशंटची सोय व्हावी या हेतूने लोकसहभागातून 25 बेडची व्यवस्था व ऑक्सिजनची व्यवस्था जिल्हाचे जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. 

या कामासाठी गावातील सर्व शाळेतील मुख्याध्यपक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य घेणार आहे. तसेच गावातील नागरीकांनी कोरोनाची लस घ्यावी व जे नागरीक लस घेत नाहीत त्यांनी लस घेण्यात प्रेरीत करावे. आशा कार्यकर्ती व अंगणवाडीच्या कार्यकर्ती यांनी घरोघरी जाऊन लस घेतलेले व न घेतलेल्या लोकांची यादी करावी. कोण आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात जाण्याची सुचना दयावी अशा सुचना सरपंच विठ्ठल साठे यांनी दिल्या. यावेळी उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रा.प.सदस्य गोवर्धन आलमले, सरदार मुजावर, अभिमन्यु कुसळकर, बाळू कांबळे, वैद्यकीय अधिकारी श्रीमती माने, ग्रामविकास अधिकारी जगताप, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.