बदनापूर - सोमठाणा येथील धरणाच्या सांडवयाला खेकडयांनी पाडलेल्या एक फुट खोलवरच्या छिद्राकडे जर पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले तर हा सांडव्यालाही धोका संभावण्याची शक्यता निर्माण झाली असल्याबाबत आदर्श गावकरीने वृत्त प्रकाशित करताच या विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले व त्यांनी हे छिद्रे बुजवले.

तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सोमठाणा येथील या प्रकल्पाच्या सांडव्याच्या खेकडे पाडत असलेल्या छिद्राची तपासणी पाटबंधारे विभागाने केली आहे. येथील छिद्रे आरपार होण्याची शक्यता होती. याविषयीचे वृत्त दैनिक आदर्श गावकरीने प्रकाशित केले होते. मात्र अधिकार्‍यांनी या सर्व अफवा असून आम्ही तपासणी केली असता काहीही दिसले नसल्याचे सांगितले.मात्र आदर्श गावकरीने सचित्र बातमी छापून हे प्रकरण उजेडात आणताच या अधिकार्‍यांनी सांडवा भिंतीवर जाऊन तेथील छिद्रे बुजवले आहे. असल्याचे आढळून आले आहे. दैनिक गावकरीने पाठपुरावा केल्यामुळे सांडव्याची दुरुस्ती शक्य झाल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी केवळ कार्यालयात बसून कामकाज न पाहता प्रत्यक्ष पाहणी करून वेळोवेळी स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी ही ग्रामस्थांची मागणी आहे.