औरंगाबाद : डॉं.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थांचे वसतीगृह, अभ्यासिका, ग्रंथालय सुरू करण्याच्या मागणीसाठी विविध विद्यार्थीं संघटनांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, विद्यार्थीं संघटनांनी विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याने आंदोलकांना अटक करण्यात आली.
राज्यात हळूहळू सर्व सार्वजनिक ठिकाणे सुरू झाली आहेत. हॉटेल, खानावळी दारूची दुकाने यापासून तर खाजगी अभ्यासिका सुद्धा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसह आदि विद्यार्थीं संघटनांनी राज्यातील शासकीय अभ्यासिका, संशोधक विद्यार्थांचे वसतीगृह सुरू करण्याची मागणी केली होती. माञ, यावर राज्य सरकारने कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एबीव्हीपी, एस.एफ.आय, संत्यशोधक आणि राष्ट्रवादी विद्यार्थीं संघटनांनी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थांचे वसतीगृह, अभ्यासिका, ग्रंथालय सुरू करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, विद्यार्थीं संघटनांनी विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याने आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेवून सोडून दिले.


एक तारखेर्यंत उघडू : आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे संशोधक विद्यार्थांचे वसतीगृह, अभ्यासिका, ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली होती. माञ, विद्यापीठाने यावर कुठलाच निर्णय कळवले नाही. त्यामुळे, आज आम्ही ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रविण वक्ते यांनी यांनी एक तारखेर्यंत विद्यार्थांचे वसतीगृह, अभ्यासिका, ग्रंथालय उघडण्याचे आश्वासन दिले आहे.
लोकेश कांबळे,एस.एफ.आय.