सेलू : समृध्दी महामार्गाच्या जालना ते नांदेड या दरम्यानच्या परभणी जिल्ह्यातून जाणार्याम महामार्गासाठीच्या जमीन संपादनाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्गांतर्गत जालना ते नांदेड दरम्यानच्या कामांसाठी लवकरच अधिसूचना निघणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. समृध्दी महामार्गांतर्गत जालना ते नांदेड या तिसर्यो टप्प्यातील आठ पदरी रस्त्याला नुकतीच मान्यता मिळाली असून त्यासाठी 5 हजार 500 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे मोपलवार यांनी नमूद केले होते.
194 किलो मीटरचा हा मार्ग असून तो मुंबईला जेएनपीटीला जोडला जाणार आहे. सुरळीत वाहतूक तसेच वेगवान दळण वळणासाठी हा महामार्ग महत्वाचा ठरणार आहे, असेही स्पष्ट केले होते. जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार असून त्यासाठी जमिनी संपादनाकरिता या चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या संदर्भातील अधिसूचना जारी करतील. त्यानंतर भूसंपादनाच्या कारवाईला प्रारंभ होईल, असे मोपलवार यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे लवकरच या संदर्भात परभणी जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यातून जाणार्याा महामार्गाच्या भूसंपादना संदर्भात अधिसूचना काढण्यासाठी हालचाली सुरु होणार आहेत.

परभणी जिल्ह्याच्या चार तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग : जालना ते नांदेड हा समृध्दी महामार्ग परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार असे चित्र आहे. सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी, चिखलठाणा, चिखलठाणा खूर्द, रायपूर, वालूर, राजूरा, गूळखंड, आडगाव, तांदूळवाडी, कान्हड, जिंतूर तालुक्यातील कौसडी, गौंढाळा, वाघी, शेख, परभणी तालुक्यातील झरी, मिर्झापूर, वाडी दमई, साडेगांव, मांगणगाव, मठकर्हाखळा, साबा, पिंपळगाव टोंग तसेच वसमत तालुक्यातील पिंपळगाव हाजम, पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वलर, नावकी, आहेरवाडी या गावातून हा महामार्ग पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे.