परळी : मुंडे आणि गर्दी हे नेहमीचेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनपासून परळीत हे चित्र बघायला मिळते. यश:श्री बंगल्यावर आज पुन्हा एकदा तीच गर्दी, तोच माहोल आणि तीच लगबग बघायला मिळत होती. भेटायला आलेल्या लोकांची गर्दी बघता बघता एवढी झाली की पंकजा मुंडे यांचा जनता दरबार तिथेच सुरू झाला. प्रत्येकाशी संवाद साधत व समस्या जाणून घेत त्यांनी ऑन द स्पॉट निराकरण केले.
कोरोनाकाळ, लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व अप्रत्यक्ष लोकांचे सेवाकार्य सुरुच होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे परळीत दाखल झाल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्यासाठी त्या उपलब्ध झाल्या. सध्या पंकजा मुंडे क्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. प्रलंबित स्थानिक विषय, संघटनात्मक विषय, राजकीय घडामोडींवर निर्णय, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संदर्भातील विषय, विविध संस्थात्मक विषय, नागरिकांचे प्रश्न आदी सर्व त्यांनी हाताळले. काल पुरग्रस्त मदतफेरीत पुर्णवेळ देत शहरातील इतर कार्यक्रम व उपक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. तसेच विविध विषयांच्या संदर्भाने बैठकांच्या फेर्‍या, जनतेच्या भेटीगाठी असा संपुर्ण दिनक्रम दिसून आला. शुक्रवारी सकाळपासुन अभ्यागतांची यश:श्रीवर रिघ लागली होती. पंकजा मुंडे यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र त्यांच्या 
निवासस्थानी बघायला मिळाले.

सांत्वनपर भेटी : पंकजा मुंडे यांनी दुपारी नाथरा येथे वैजनाथ श्रीरंग मुंडे, रामकिशन सोपान मुंडे, फुलाबाई बाबुराव मुंडे, सुरेखा महादेव कोपरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले तसेच सायंकाळी मालेवाडी येथे जाऊन ज्येष्ठ कार्यकर्ते वैजनाथराव बदने यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. तर सकाळी कसबे आणि गोदाम परिवाराच्या विवाहास हजेरी लावून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.