किनवट :  किनवट तालुक्यात 15 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संततधार तसेच अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व कापसाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानिचे तात्काळ पंचनामे करुन शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना आ. केरामांनी तहसीलदारांना दिल्या होत्या. ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे यांनी आमदारांना पत्र दिल्यावरुन तहसिलदारांना सूचना दिल्या आहेत.
किनवट तालुक्यातील बोधडी परिसरातील येंदा,पेंदा,भुलजा,बोधडी (खु.), दाभाडी, शनिवारपेठ, दरसांगवी शिवारात झालेल्या पावसामुळे कापूसाची बोंडे नासून गेले, बोंडांसह पात्यांचीही गळ झाली. सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने सोयाच्या झाडाला लागलेल्या अर्ध्याच्यावर शेंगा भरलेल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. उसाचे पीकही जमीनध्वस्त झाले आहे. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याच्या उद्देशाने भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे आणि रघूनाथ कराड यांनी आमदार केराम व तहसिलदार यु.एन.कागणे यांच्याकडे निवेदन दिले आहे. आ. केराम यांनी किनवट व माहूरच्या तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.