श्रीक्षेत्रमाहूर - माहूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणी जबाबदार असणार्‍या कारवाईच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा राहुल गडेकर यांनी दिला होता. या प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी व जिल्हा गौण खनिज अधिकारी यांना चौकशी करावी असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

माहूर तालुक्यातील टाकळी येथे दि.16 नोव्हेंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार यांनी धाड टाकून अवैध रेती साठा जप्त केला होता. याप्रकरणी व सन 2019 ते 2020 या कालावधीत रेती घाटांचा लिलाव झालेला नसतानाही शेकडो ब्रास रेती अवैधरीत्या उपसा झाली. तहसीलदार तसेच रेती साठा करणार्‍यांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा राहुल गडेकर यांनी दिला होता. यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी एका पत्रान्वये प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी व जिल्हा गौण खनिज अधिकारी यांना दिले आहेत.