वडोद बाजार : अवैधरित्या वाळूची वाहतुक करणारा ट्रॅक्टर वडोद बाजार पोलिसांनी पकडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत गिरजा नदीकाठी रात्रीच्यावेळी अवैधरित्या वाळूची वाहतुक होत असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा लावला असता वडोद बाजार गावालगत मारुती मंदिराजवळ एक ट्रॅक्टर 1 ब्रास वाळूसह पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी 4 लाख 45 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर चव्हाण करीत आहेत.