तामसा : तामसापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर उमरी जहागीर हे गाव असून अजूनही विकासाच्या दृष्टीने कोसो दूर आहे. बर्‍याच वर्षापासून येथील शाळेला जाण्यासाठी  धड रस्ता नसल्याने, शाळकरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी होत आहे. याउलट शहरी भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ताही साधनाच्या विपुलतेवर अधिक असल्यानेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी स्पर्धेत मागे पडताना दिसून येत आहेत.
पावसाळ्यातील थोडा जरी पाऊस पडला तरी जागोजागी पाणी साचून डबकी बनल्याचे चित्र आहे. नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना सक्तीने चिखल तुडवून शाळेची वाट शोधावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचीचे धडे  कसे गिरवाने असा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाविषाणू उद्भवलेल्या संकटामुळे सर्व शाळा बंद होण्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती अमलात आली. परंतु ही प्रणाली विद्यार्थ्यासाठी कितपत फलदायी ठरली यांचे सध्या मंथन सुरू आहे.
या भागाचे विकासाभिमुख आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी हा रस्ता मार्गी लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु कोरोना अभावी सदर रस्त्याला मान्यता न मिळाल्यामुळे हा रस्ता प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे.