तामसा : सततच्या पाण्यामुळे संपूर्ण: पाण्याखाली गेल्यामुळे कापसाची बोंडे सडून खाली जमिनीवर गळून पडली. शिल्लक राहिलेले शेतातील पांढरे सोने लाल्या रोगांने ग्रासले गेले आहे. त्यामुळे पाने, फुले, गळत असून उत्पन्न घटून वेचणीला तरी  कापूस परवडेल की नाही असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.यावर्षी शेतकर्‍यांना कापसाऐवजी सोयाबीन अधिक प्राधान्य दिले. परंतु सप्टेंबर महिन्यात पडलेल्या सततच्या पावसाने पिकांना फटका बसला. त्यामुळे उभ्या सोयाबिन ला मोड फुटले, पाण्याखाली कापूस  गेल्याने बोंडे गळून जमिनीवर पडली. परंतु शिल्लक असलेले कापूस पिक मात्र लाल्या या भयानक रोगांने ग्रासले सल्याने शेतकर्‍यांवर संकट उभे राहिले आहे.

तामशात कापसाला मिळाला साडेसात हजाराचा दर
तामसा :
अगदी तोंडावर आलेला दिवाळी सण आहे. कापूस सोयाबीन पिकांची फार मोठ्या प्रमाणात वाढती आवक पाहाता बाजारातील शेती मालाचे भाव गडगडले आहेत. मात्र केवळ शेतकर्‍यांचे हित म्हणून येथील बालाजी काँटन जिनिंगने कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रती क्विंटल भाव देत कापूस खरेदी सुरु केल्याची माहिती व्यवस्थापक विजय परमाल यांनी दिली. नुकताच झालेल्या  नुकसानी नंतर शेतकर्‍यांनी शेतातील सोयाबीन काढणी, कापुस वेचणीच्या कामाला सुरवात झाली आहे. दिवाळी सण जवळ आल्याने लागणारा खर्च करण्यासाठी सोयाबीन, कापूस बाजारपेठेत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणला जात आहे. सोयाबिनला मॉइश्चर, डागेलच्या नावाखाली कट्टी  हमाली भाव फरक करित कवडीमोल भावात देण्याची वेळ आली आहे.  यावर्षी कापसाला मागणीनुसार चांगला भाव असला तरी असला तरी तामसा भागातील व्यापार्‍यांकडून कापसाची खरेदी देखील कवडीमोल भावात खरेदी करून शेतकर्‍यांची लूट केली जात आहे. मात्र तामसा-नांदेड रोडवर असलेल्या बालाजी काँटन जिनिंग वर तामसा बाजारपेठ पेक्षा जास्त भाव देण्यात येत आहे. सात हजार पाचशे रुपये प्रती क्विंटल भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याचे चित्र आहे. चांगल्या भावामुळे बालाजी काँटन वर कापसाची आवक वाढत आसून शेतकर्‍यांना वाहतुकीची समस्या नाही. शिवाय पैसे ताबडतोब होत असल्याचे विजय परमाल यांनी सांगितले.