माजलगाव : तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर गुरुवार रोजी माजलगाव नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख मंजूर यांचा व्यापारी बांधवाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी शहरातील वाढत्या चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी सि.सि.टि.व्ही.कॅमेरे बसवण्याचे आश्वासन व्यापारी महासंघाला दिले.

माजलगावचे नुतन नगराध्यक्षपदी शेख मंजूर यांची बिनविरोध निवड झाली असता माजलगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार प्रसंगी नुतन नगराध्यक्षशेख मंजूर यांनी माजलगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातील वाढत्या चोर्‍याचे प्रमाण लक्षात घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा विचार चालू आहे.व्यापारी बाधवांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराजे रांजवन, प्रमुख पाहुणे म्हणून न.प. गटनेते रोहन घाडगे, ईश्वर होके, व विजय शिंदे हे उपस्थित होते. सुत्रसंचालन भगवान शेजुळ यांनी केले तर प्रस्ताविक संजय इंदानी यांनी केले. यावेळी अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांनी शहरातील व्यापारी मित्रांच्या विविध समस्या या प्रसंगी मांडल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासचिव सुनील भांडेकर, जफर मिर्झा, गणेश लोहिया, शेख सल्लाउदी, मोहन घुले, फेरोज ईनामदार आदींनी परिश्रम घेतले.