उमरगा : एकीकडे ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप रोमांच शिगेला पोहोचला असताना आता वर्ड कप सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याचा मोठा प्रकार समोर आला आहे.रविवारी उमरगा शहरात पोलिसांनी छापा टाकून 35 हजार रुपयांसह दोन जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनुसार टी-20 वर्ल्डकप सामने सुरू आहेत. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान अन् बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या माहितीची पूर्ण खातरजमा करण्यात आली.पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी कामतकर, पोलीस शिपाई बांगर, पोलीस शिपाई झाटे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. उमरगा पोलिसांनी विश्व बार मध्ये छापा टाकला. तेथे अमोल जाधव व रमेश जाधव हे ताब्यात बांगलादेश विरुध्द श्रीलंका क्रिकेट सामन्यावर सट्टा लावून जुगार लावत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून दोन मोबाइल, रोख दोन हजार तीनशे रुपये असा एकूण 35 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केले. तसेच या दोघांनाही ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अमोल व रमेश यांना नोटीस देवून सोडण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान कवडे यांनी सांगितले.