कळमनुरी - सतत रुग्ण सेवेसाठी तत्पर असणारे कळमनुरी नगरपरीषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मो. नाजीम रजवी यांच्या कामाची दखल पक्षातील वरिष्ठ मंडळीकडून घेण्यात आली आहे.

खा. सुप्रिया सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यांकडून रजवी यांचे कौतुक करण्यात आले. नाजीम रजवी हे 2006 पासून कळमनुरी न.प. चे नगरसेवक आहेत. ते उपनगराध्यक्ष ही होते त्यांनी एनसीपी रुग्ण सेवा हेल्पलाईनच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांना औरंगाबाद, मुबंई ,पुणे, जालना, नांदेड येथील नामवंत रुग्णालयात मोफत उपचारासाठी सहकार्य करत आहेत.

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा होता. त्यावेळी अनेक रुग्णांना रक्ताची व्यवस्था करुन देण्याचे काम मो.नाजीम रजवी यांनी केले आहे. मो.नाजीम रजवी यांनी केलेल्या कामाचा अहवाल नुकताच मुंबई येथे पक्षाच्या वरीष्ठ नेते मडंळीची भेट घेऊन सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेत्यानी मो. नाजीम रजवी यांच्या कामाचे कौतुक केले आहे.