बीड : माध्यमिक शिक्षण विभागाची खातेनिहाय चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण संघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरे आंदोलन ग्रामपंचायत कार्यालयाच्या विरोधात सुरू आहे.

अनुसूचित जमातीच्या आरक्षणातील ज्या शिक्षकांनी अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना नोकरीवरून ताबडतोब कार्यमुक्त करावे तसेच त्यांना दिलेला पगार व इतर लाभ हा जमीन महसूलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करावा, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभागाची खातेनिहाय चौकशी करावी, या मागणी भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण सघाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी नवनाथ रोहितास काळे यांच्यासह आदींची उपस्थिती आहे तर दुसरे आंदोलन नागझरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या विरोधात करण्यात येत आहे.