लातूर : राज्यात अग्रेसर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपा पॅनलच्या उमेदवारांचे  सर्वच अर्ज गुरुवारी झालेल्या छाननीत बाद झाल्याने काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांच्या सहकार पॅनलचे 18 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत.
गुरुवारी झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे छाननीत एकच अर्ज काही मतदार संघात राहिल्याने त्यात प्रक्रिया मतदार संघातून काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील (अहमदपूर), मारोती पांडे (जळकोट) नागनाथ पाटील (चाकुर), या चार जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तर उर्वरीत 15 जागेपैकी केवळ एका मतदार संघात भाजपा प्रणित उमेदवारांचा फॉर्म असल्याने इतर 14 जागेवर काँग्रेसच्या उमेदवारांचे फक्त फॉर्म असल्याने त्याही जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्यामूळे केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली असून 33 वर्षांपासून जिल्हा बँकेत देशमुख परिवाराची सत्त्ता राहिलेली आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत काँग्रेसचे पॅनल निवडून बिनविरोध निवडून येताच जिल्हयात सर्वत्र फटाके वाजवून शेतकरी सभासद काँग्रेसच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम सुरू झाले होते. एकीकडे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलच्या वतीने 19 जागेसाठी 34 फॉर्म दाखल केले होते तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपा प्रणित पॅनलने 83 फॉर्म दाखल केले होते. या सर्व फॉर्मची जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी छाननी केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज बाद व विधी ग्राह्य झालेल्या रात्री उशिरा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.