माजलगाव : तालुक्यातील 10 ते 15 गावांतील परिसरात शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पात्रूड येथील नदीला पूर आला आणि पुलाचे काम चालू असल्याने पर्यायी पूल खचल्याने, मोगरा, लोनगाव, देवळा, सिमरी पारगाव व घळाटवाडी येथील पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावाचा सपर्क तुटला आहे.
माजलगाव तालुक्यात शनिवार रोजी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे सरस्वती नदीला पहिल्याच पावसात पूर आला.देवळा येथील पुलावरून पाणी आल्याने देवळा,उमरी बु,सिमरी पारगाव, जीवनापूर,मोगरा या गावांचा माजलगाव शहराशी संपर्क तुटला आहे.तर लोणगाव येथून ओढ्याला पूर आल्याने लोणगावचा संपर्क तुटला आहे,पात्रूड येथे दीड वर्षांपासून पुलाचे काम कासव गतीने चालू आहे, या पुलाला पर्यायी पूल तयार केला होता. तो पूल रात्री झालेल्या पावसाने खचल यामुळे बेलुरा, आनंदगाव, आलापूर, नाकलगाव, भगवान नगर, महादेव वस्ती यासह मोगरा येथील खडखडीला पुर आल्याने मोगरा गावासह 10ते 15 गावांचा माजलगाव शहराशी संपर्क तुटला असुन तालुक्यात पहिलाच पाऊस धुव्वाधार झाल्याने बळीराजा खूश झाला आहे. 

पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे घेण्यासाठी 10 ते 15 गावातील शेतकर्यांना माजलगाव शहरात येण्यास अडचण निर्माण झाली आहे.