मुंबई : मागील वर्षभरापासून एकीकडे कोरोना, तर दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे मोठे नुकसान  होत आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानामध्ये मोठे फेरबदल होताना दिसून येत आहे. कडाक्याचा उन्हाळ्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे, ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा आदांज दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात १८ ते २१ मार्च  २०२१ दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर, काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याआधीच आपला शेतमाल जपून ठेवावा अश्याही सूचना हवामान खात्याने दिला आहे.

अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्रित येणार असल्याने होणाऱ्या आंतररक्रीयेच्या प्रभावामुळे पोषक स्थिती असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. यामुळे १८ ते २१ या तीन दिवसात मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
देशात महाराष्ट्रासह मध्ये प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे.

कुठे आहे पावसाची शक्यता?
१)पुण्यासह नजिकच्या शहरांमध्ये
२)मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव
३) मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी बीड
४) विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
५)कोकणातील रत्नागिरी आणि रायगड इथंही पावसाची शक्यता

[removed][removed]